ऑनलाईन सराव प्रश्नसंच १७

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'शेतकरी शेताची मशागत करतो' या वाक्यातील 'शेतकरी' या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

भूप
नंदन
कष्टकरी
कुणबी

2. खालीलपैकी कोणता जोडशब्द नाही ?

दागदागिने
दाणापाणी
दाणेदार
दगडधोंडा

3. तबेल्यात कोण राहतो ?

घोडा
हत्ती
बैल
माणूस

4. 'नरेंद्र विश्वनाथ दत्त' हे नाव कोणाचे आहे ?

संत गाडगेबाबा
स्वामी विवेकानंद
बाबा आमटे
नरेंद्र दाभोळकर

5. 'इवलेसे रोप लावियले दारी' या ओळीतील विशेषण ओळखा ?

रोप
इवलेसे
लावियले
दारी

6. ..... हे संदेशवहनाचे साधन आहे.

विमान
वृत्तपत्र
पालखी
बैलगाडी

7. आपल्या देशाचे संविधान कधी तयार करण्यात आले ?

प्राचीन काळात
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात
स्वराज्य स्थापनेपूर्वी
स्वातंत्र्य मिळाल्यावर

8. पावसापासून बचावासाठी कशाचा वापर केला जात नाही ?

इरले
सुती कपडे
रेनकोट
छत्री

9. पुढीलपैकी कोकणातील नदी कोणती ?

वैनगंगा
मुळा
सावित्री
तापी

10. कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ?

पौर्णिमा
अमावस्या
चतुर्थी
अष्टमी

11. खालील गटात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ?





12. एका रांगेत १४ विद्यार्थी उभे आहेत. दोन विद्यार्थ्यांमध्ये ५ मीटरचे अंतर आहे तर त्या रांगेची लांबी किती ?

७० मीटर
६५ मीटर
५० मीटर
५५ मीटर

13. खालील आकृत्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती ?





14. गावात स्वच्छता अभियान सुरु आहे अशावेळी तुमची कोणती कृती योग्य ठरेल ?

शक्य होईल तितका सहभाग घेणे
कोण कोण काम करतात ते पाहणे
किती काम झाले आहे ते बघणे
काम करावे लागेल म्हणून तिकडे न जाणे

15. खालील आकृतीतील अर्धवर्तुळांची संख्या किती ?



पाच
सात
आठ
तीन

16. प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?

'आम्हास भेटणे तुमच्या हिताचे आहे'
'तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या'
'आम्ही तुमचे हितचिंतक आहोत, आमची भेट घ्यावी'
'शहाजीराजे आमचे परममित्र आहेत, आम्ही तुमचा आदर करतो'

17. राज्याभिषेकासाठी ..... नद्यांचे पाणी आणले होते.

सात
पाच
आठ
तीन

18. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत म्हणून शिवाजी महाराजांनी कोणता ग्रंथ तयार करवून घेतला ?

व्यवहार कोश
राजकोश
राज्यव्यवहार कोश
राजमुद्रा

19. 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' हे उद्गार कोणी काढले ?

संत ज्ञानेश्वरांनी
संत मुक्ताबाईंनी
संत सोपानदेवांनी
संत एकनाथांनी

20. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?

सुरतेची संपत्ती लुटण्यासाठी
सुरत जिंकण्यासाठी
औरंगजेबावर वचक बसवण्यासाठी
औरंगजेबाचा पराभव करण्यासाठी



ऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..?