इ. १ ली - आला पाऊस आला (गाणे)

गाणे

पाऊस पडतो, सर सर सर
घरी चला रे, भर भर भर !

पाऊस वाजे, धडाड् धूम
धावा, धावा ठोका धूम !

धावता, धावता गाठले घर
पड रे पावसा दिवसभर !

पड रे पावसा, चिडून चिडून
आईच्या कुशीत, बसलो दडून !

- शांता शेळके

तोंडी प्रश्नोत्तरे

प्रश्न १ - पाऊस कसा पडतो ?
उत्तर : पाऊस सर सर सर पडतो.

प्रश्न २ - पाऊस आल्यावर कुठे दडून बसलो ?
उत्तर : पाऊस आल्यावर आईच्या कुशीत दडून बसलो.

प्रश्न ३ - मुले काय करीत आहेत ?
उत्तर : मुले खेळत आहेत.

प्रश्न ४ - मुले का नाचत आहेत ?
उत्तर : पाऊस आल्यामुळे मुले नाचत आहेत.

  • गाण्यातील गती दाखवणारे शब्द कोणते आहेत ?
सर सर सर
भर भर भर
  • या गाण्यातील आवाज दाखवणारा शब्द म्हणा
धडाड् धूम
  • ऐका व म्हणा :
पाऊस कसा पडतो ? - सर सर सर.
पाऊस कसा वाजतो ? - धडाड् धूम


१ लीचे ऑफलाईन अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा