ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४६

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. चुकीची समूहदर्शक जोडी ओळखा

भाकर्यांची - चवड
वर्तमानपत्रांचा - गठ्ठा
फुलझाडांचा - गुच्छ
तारकांचा - पुंज

2. 'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

कोल्ह्याला काकडी आवडते
बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो
सामान्य माणसे क्षुल्लक गोष्टींवर समाधानी होतात
कष्ट केल्यावर मोठेपणा मिळतो

3. वाद्यांच्या समूहास काय म्हणतात ते पर्यायातून शोधा.

जुडी
आवाज
ढीग
वृंद

4. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ' या वाक्यातील क्र‍ियापद ओळखा

आमच्याजवळ
तुम्हीही
काका
बसा

5. खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते ?

या वर्षी कमी पाऊस पडतो
मागील वर्षी दमदार पाऊस पडला
पुढील वर्षी भरपूर पाऊस पडेल
दरवर्षी शेतकरी पावसाची वाट पाहतात

6. इष्टिकाचितीच्या कडांपेक्षा शिरोबिंदूंची संख्या कितीने कमी अगर जास्त असते ?

६ ने कमी
४ ने जास्त
६ ने जास्त
४ ने कमी

7. १६ या संख्येची वर्गसंख्या तीनशेपेक्षा कितीने लहान आहे ?

५४
२५६
५६
४४

8. ८ ने विभाज्य असणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

४०७०
५५८५
७९९२
३०८२

9. पुस्तक आणि वही यांची उकूण क‍िंमत ३६ रुपये आहे. पुस्तकापेक्षा वही ८ रुपयांनी स्वस्त आहे तर वहीची किंमत किती रुपये ?

२८
२२
१४


10. खालील पर्यायातील कोणत्या संख्येत २ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे ?

२३०६७
३०६७२
३०२६७
३२०६७

11. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

तापी
पूर्णा
प्रवरा
गोदावरी

12. पीक चांगले येण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ?

चांगले बियाणे
सुपीक जमीन
पुरेसा सूर्यप्रकाश
सर्व पर्याय बरोबर

13. खालीलपैकी अंडी उबवणारा प्राणी कोणता ?

गाय
म्हैस
कुत्रा
कोकिळा

14. मेसोपोटेमिया शहराची ५००० वर्षापूर्वीची पाटी कशावर बनवलेली आहे ?

मातीची पाटी
हाडांची पाटी
दगडांची पाटी
कवड्यांची पाटी

15. कुष्ठरोग्यांची सेवा कोणी केली ?

महात्मा फुले
महात्मा गांधी
बाबा आमटे
महर्षी कर्वे

16. खालीलपैकी न्यायाधीश कोण होते ?

आण्णाजी दत्तो
हंबीरराव मोहिते
मोरो त्रिंबक पिंगळे
निराजी रावजी

17. खानाच्या भेटीच्यावेळी खालीलपैकी कोणता अंगरक्षक महाराजांसोबत नव्हता ?

बडा सय्यद
सिद्दी इब्राहिम
येसाजी कंक
कृष्णाजी गायकवाड

18. खालीलपैकी कोणाला शिवाजी महाराजांनी मदत केली ?

दौलतराव मोरे
प्रतापराव मोरे
भुजंगराव मोरे
यशवंतराव मोरे

19. पावनखिंड कोणत्या किल्ल्यांच्या मध्ये आहे ?

राजगड - रायगड
पन्हाळा - विशाळगड
पन्हाळा - प्रतापगड
पन्हाळा - भुदरगड

20. नूर बेग हा कोणत्या दळाचा प्रमुख सेनानी होता ?

घोडदळ
आरमार दळ
शिलेदार
पायदळ