अन्न

जीवन सुरळीत चालण्यासाठी सजीवांना ऊर्जेच्या सतत पुरवठ्याची गरज असते. ऊर्जा मिळवण्यासाठी ज्या पदार्थांचे सेवन केले जाते त्यांना अन्न म्हणतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा वापर करून आपले अन्न बनवितात. प्राण्यांना अन्नासाठी वनस्पतींवर व इतर प्राण्यांचे दूध, अंडी व मांस वगैरेंवर अवलंबून रहावे लागते.

मानवाला काम करण्यासाठी उर्जा लागते. ही उर्जा किंवा कॅलरीज अन्नातून मिळतात म्हणून अन्नाची किंवा आहाराची आवश्यकता असते. माणसाला वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, भाज्या दूध, वगैरे पदार्थापासून उर्जा मिळत असते.

प्रत्‍येक व्यक्तीला लागणारी ऊर्जा ही तिचे वय, लिंग, वजन, उंची, देश, काल व ती व्यक्ती करीत असलेले काम यांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती फार श्रमाचे काम करीत असेल, तर तिला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अन्नापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे मूल्य किलोकॅलरीत देण्याचा प्रघात आहे.

शरीराची वाढ करणे, नवीन पेशींची निर्मिती करणे तसेच रोग प्रतिबंधक शक्तीची निर्मिती व संवर्धन करण्यासाठी अन्नातून मिळणार्या ऊर्जेचा वापर केला जातो.

अधिक वाचनासाठी संदर्भदुवे

 आहार म्हणजे काय ? (आरोग्य.कॉम-जीवनाशी नाते)
अन्न (मराठी विश्वकोश)