ऑनलाईन सराव प्रश्नसंच ११

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. पुढील गटातील चुकीचे पद ओळखा ?
वांगी, टोमॅटो, भोपळा, बटाटा, दोडका

दोडका
भोपळा
टोमॅटो
बटाटा

2. दिवाळीची २१ दिवसांची सुट्टी ११ ऑक्टोबरला सुरु झाली, तर सुट्टी संपल्यानंतर शाळा कोणत्या तारखेला सुरु होईल ?

३ नोव्हेंबर
४ नोव्हेंबर
१ नोव्हेंबर
२ नोव्हेंबर

3. कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर प्रत्येक रांगेत १८ मुले असतील, तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती ?

६४८
३२४
१६२
५७८

4. संग्राम मंदिराकडे तोंड करुन उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती ?

उत्तर
दक्षिण
पश्चिम
पूर्व

5. पुढीलपैकी चुकीची तारीख ओळखा ?

३१ जानेवारी २०१८
३१ जून २००९
३० ऑगस्ट २०२९
३० डिसेंबर २०१२

6. शरीराच्या वाढीवर व हालचालींवर कोणत्या इंद्रियाचे नियंत्रण असते ?

फुफ्फुसे
मेंदू
डोळा
जठर

7. पुढीलपैकी सरड्याचे अन्न कोणते ?

गवत
उंदिर
झाडपाला
किडे

8. मानवाच्या अन्नमार्गाची लांबी सुमारे ..... असते.

१ मीटर
९ मीटर
५० मीटर
४ मीटर

9. उजनी धरण ..... नदीवर आहे.

पूर्णा
नीरा
भीमा
प्रवरा

10. आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस कोणता ?

२२ डिसेंबर
२१ जून
२२ मार्च
२१ मे

11. पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्य कोणते ?

मी अभ्यास करतो
मी अभ्यास करीत होतो
मी अभ्यास करीन
मी अभ्यास केला

12. खांब या शब्दाचे अनेकवचन कोणते ?

खांबा
खांब
खंबा
खांबे

13. 'डोंगराआडून सूर्य उगवला. ...... दृश्य सुंदर होते' या वाक्यात रिकाम्या जागी कोणते सर्वनाम येईल?

तो
ती
त्या
ते

14. घुबडाच्या घराला काय म्हणतात ?

ढोली
पागा
गोठा
वारुळ

15. पुढीलपैकी कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलेला नाही ?

यशवंत
जिवंत
गुणवंत
बलवंत

16. तानाजी हा कोकणातील ....... गावचा राहणारा होता.

महाड
उमरठे
रत्नागिरी
पोलादपूर

17. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

राजगड
रायगड
पुणे
प्रतापगड

18. ...... रक्ताने घोडखिंड पावन झाली.

बाजी घोरपडेच्या
तानाजी मालुसरेच्या
बाजीप्रभूच्या
मुरारबाजीच्या

19. ....... हे मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते.

संत ज्ञानेश्वर
श्रीचक्रधर स्वामी
संत एकनाथ
समर्थ रामदास

20. चाकणचा किल्ला ..... ने दोन महिने लढवला.

मुरारबाजी
तानाजी मालुसरे
बाजीप्रभू देशपांडे
फिरंगोजी नरसाळा



ऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..?