ऑनलाईन सराव प्रश्नसंच ६

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'अंधार' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

प्रकाश
तामस
तमा
तम

2. जसे साधूंचा जथा, तसे लमाणांचा ......

घोळका
जमाव
तांडा
ताफा

3. रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली ?

कर्मवीर भाऊराव पाटील
स्वामी विवेकानंद
रवींद्रनाथ टागोर
महाराजा सयाजीराव गायकवाड

4. पुढील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द कोणता ?

गाय
बैल
वासरू
पिलू

5. प्रत्यय असणारा शब्द ओळखा.

सुगंध
कष्टकरी
विचित्र
कुप्रसिद्ध

6. जर blackboard शी निगडीत duster हा शब्द असेल, तर farm शी निगडीत शब्द कोणता ?

play
plough
bird
dust

7. ग्रेगरीयन वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या महिन्याने होते ?

December
July
June
January

8. Golden या शब्दापासून अर्थपूर्ण होणारा शब्द कोणता ?

gode
gold
gen
ned

9. तूमच्या वर्गाच्या कबड्डी संघाने सामना जिंकला आहे. तुम्ही तुमच्या कर्णधाराचे अभिनंदन कसे कराल ?

Thank you !
Very good !
Congratulations !
What a surprise !

10. 'छत्तीस हजार एकोणऐंशी' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?

36089
36079
३६०७९
३६०८९

11. खालील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील ७ या अंकाची स्थानिक किंमत ७०० येईल ?

३५७३९
५३७४
७८९०
७७०७७

12. एका गावामध्ये १४०८४ पुरुष व १३१०९ स्त्रिया आहेत, तर त्या गावची एकूण लोकसंख्या किती ?

२७२९३
२७१९३
२७०९३
२७१८३

13. ४४ च्या आधीची पाचवी विषम संख्या कोणती ?

३७
३३
३९
३५

14. २ हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?

१८
१९
२०
२१

15. सुती कापडाचा मूळ स्रोत कोणता ?

प्राणी
रेशमी किडे
खनिज तेल
वनस्पती

16. खालीलपैकी पाण्यात तरंगणारी वस्तू कोणती ?

खोडरबर
प्लॅस्टीकची पट्टी
खिळा
खडे

17. पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात ?

पृथ्वीचे परिवलन
चंद्राचे परिवलन
सूर्याचे परिवलन
चंद्राचे परिभ्रमण

18. 'बंड केलिया मारले जाल' हे उद्गार कोणाचे ?

चंद्रराव मोरे
आदिलशाहा
शिवाजी महाराज
यशवंतराव मोरे

19. शिवराय बालपणी कर्नाटकात असताना कोंढाण्याचे सुभेदार कोण होते ?

तानाजी मालुसरे
दादाजी कोंडदेव
उदेभान
चंद्रराव मोरे

20. मुरारबाजीने कोणत्या किल्ल्यावर अतुल पराक्रम गाजवला ?

कोंढाणा
पन्हाळा
शिवनेरी
पुरंदरऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..? इंद्रजित भालेराव