ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४७

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

प्रश्न 1 ते 3 : खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा.

पुण्याजवळ सासवड नावाचं गाव आहे. या सासवडजवळचं प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे पुरंदर. सिंहगडापासून निघालेली डोंगररांग पंधरा ते वीस किलोमीटर आहे. ती भुलेश्वरापाशी संपते. या डोंगररांगेतच कात्रज, बापदेव, दिवे, बोर हे घाट आहेत. बापदेव घाटाजवळ या डोंगररांगेपासून दक्षिणोत्तर जाणारी शाखा आहे आणि तिलाच चार-सहा किलोमीटरवर एका पूर्व-पश्चिम डोंगररांगेची शाखा फुटली आहे. या डोंगररांगेतच पुरंदर आणि वज्रगड हे जोडकिल्ले आहेत. पुरंदर हा यादवकालीन प्राचीन गड आहे. या गडाने आजवर बहामनी, निजामशाही, आदिलशाही, शिवशाही आणि पेशवाई बघितली. माधवराव यांचा जन्म इथेच झाला. इंग्रजांच्या काळात इथे लष्करी तळ होता. आजही आपला लष्करी तळ इथे आहे. प्रचंड असूनही तुलनेने चढायला सोपा असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे.


1. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड
पुणे
सातारा
अहमदनगर

2. खालीलपैकी कोणत्या घाटाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही ?

कात्रज
बापदेव
फोंडा
बोर

3. पुरंदर किल्ल्याचे वैशिष्ट्य कोणते ?

प्रचंड असूनही तुलनेने चढायला अत्यंत अवघड असलेला किल्ला आहे
हा किल्ला सागरी किल्ला आहे
शिवरायांचा राज्याभिषेक या किल्ल्यावर झाला
प्रचंड असूनही तुलनेने चढायला अत्यंत सोपा असलेला किल्ला आहे

4. 'वाटेतला सांकव ओलांडून आम्ही पलीकडे आलो' या वाक्यातील सांकव या शब्दासाठी येणारा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा.

डोंगर
पूल
समुद्र
ओढा

5. 'म्हैस' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

एडका
महिष
रेडी
बैल

6. खालील आकृतीत फक्त त्रिकोनात कोणता अंक आहे ?








7. एका रांगेत १३ विद्यार्थी उभे आहेत. दोन विद्यार्थ्यांमध्ये ५ मीटर अंतर आहे तर त्या रांगेची एकूण लांबी किती ?

६५ मी
७० मी
५५ मी
६० मी

8. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा.





9. संजय व कमल यांना गणित विषय आवडतो. सार्थकला सर्व विषय आवडतात. जान्हवीला विज्ञान सोडून सर्व विषय आवडतात. संगिताला भाषा आणि समाजशास्त्र हे विषय आवडतात. तर जास्तीत जास्त मुलांचा आवडता विषय कोणता ?

भाषा
विज्ञान
गणित
समाजशास्त्र

10. 'कवडीचुंबक' या शब्दातील क या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते ?



चुं
डी

11. खालील आकृतीत दिसणारा कोन कोणत्या प्रकारचा आहे ?



लघुकोन
काटकोन
विशालकोन
सरळकोन

12. ११ तारखेनंतर १५ दिवसांनी कोमल प्रवासाला निघणार आहे तर प्रवासाला निघण्याची तिची तारीख कोणती ?

१६
२४
२५
२६

13. खालील आकृतीतील एकूण आयतांची संख्या किती ?



२०
१०
१४
१५

14. एका संख्येला १८ ने भागले असता भागाकार १५ येतो व बाकी ७ येते तर ती संख्या कोणती ?

२७७
२७०
३७७
३७०

15. ३, ५ व ९ यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

२७
१८
३६
४५

16. आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तीच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मदत करणे, म्हणजे '........' असणे होय.

समजूतदार
उदारशील
दयावान
संवेदनशील

17. सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो ?

पश्चिम घाट
सातपुडा
पूर्व घाट
गोदाखोरे

18. मासे पाण्यात राहू शकतात कारण ..........

त्यांना पाण्यात पोहता येते
त्यांना पाण्यात विरघळलेला कार्बन डाय ऑक्साईड श्वसनासाठी वापरता येतो
त्यांना पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कल्ल्यांद्वारे श्वसनासाठी वापरता येतो
त्यांना पाण्यात विरघळलेला गाळ अन्न म्हणून उपयोगी पडतो

19. व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती ?

कामावर देखरेख ठेवणे
कामाचा आराखडा तयार करणे
खर्चावर नियंत्रण ठेवणे
होणार्या कामाचा आढावा घेणे

20. कोणत्या बदलामुळे बेडूक जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात ?

जाणवणारी उष्णता
पडणारा पाऊस
झाडांची पानगळ
वातावरणातील थंडी