इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच ६

इयत्ता ३ री

विषय - भाषा

सराव प्रश्नसंच

निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ

☎ 9822012435

सराव प्रश्नसंच ६

सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

सुस्वागतम

1. खजिन्याची गोष्ट कोण सांगत आहे ?

मुलगी
सरपंचबाई
आजी
मुलगा

2. खजिनाशोधाच्या दिवशी वर्गात किती विद्यार्थी हजर होते ?

२५
२७
२६
२४

3. 'खजिनाशोध' या पाठात मुलांच्या गटाला कोणता शब्द आलेला आहे ? ?

टोळकं
टोळी
बालचमू
सर्व बरोबर

प्रश्न क्रमांक ४ ते १० साठी दिलेल्या पर्यायातून समूहदर्शक शब्दाचा योग्य पर्याय निवडा.

4. चपातीची/भाकरीची

गठ्ठा
थप्पी
रास
चवड

5. पुस्तकांचा/वर्तमानपत्रांचा

चवड
गठ्ठा
थप्पी
रास

6. धान्याच्या पोत्यांची

चवड
गठ्ठा
रास
थप्पी

7. धान्याची

चवड
गठ्ठा
थप्पी
रास

8. भाजीची

रास
घड
जुडी
जथ्था

9. केळ्यांचा

गठ्ठा
जुडगा
घड
जथ्था

10. माणसांचा

गठ्ठा
जमाव
जुडगा
घड

11. जसे वाहनांचा - ताफा तसे हरणांचा ........

कळप
ढीग
झुबका
घोस

12. जसे केळीची - फणी तसे द्राक्ष्यांचा ........

ढीग
झुबका
घोस
घोस

13. 'अगं ए, शाळा सोडून कुठं चाललयं टोळकं ?' असे कोण म्हणाले ?

बाई
आजोबा
सरपंचबाई
आजी

14. चिंगीच्या आजोबांनी मुलांच्या गटाला उद्देशून खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द वापरला ?

झुंड
टोळकं
बालचमू
टोळी

15. सरपंचबाईंनी मुलांच्या गटाला उद्देशून खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द वापरला ?

टोळकं
बालचमू
झुंड
टोळी

16. बोरावाल्या आजीने मुलांच्या गटाला उद्देशून खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द वापरला ?

बालचमू
झुंड
टोळी
टोळकं

17. केंद्रप्रमुखांनी मुलांच्या गटाला उद्देशून खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द वापरला ?

बालचमू
झुंड
टोळकं
टोळी

18. अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा .......... चाललाय.

घोळका
जमाव
थवा
कळप

19. अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा .......... मिळालाय.

जुडगा
गुच्छ
घड
झुबका

20. मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा ....... असतो.

घड
ताफा
गठ्ठा
जुडगा