ऑनलाईन सराव प्रश्नसंच ३८

शुक्रवार दि. ०६ मार्च २०१५ रोजी बहुतेक शाळांना सुट्टी असल्याने ५० प्रश्नांचा सराव प्रश्नसंच देण्यात येईल. मात्र हा सराव प्रश्नसंच ज्या विद्यार्थ्यांना/शिक्षकांना/पालकांना ऑनलाईन सोडवायचा आहे त्यांना त्यासाठी User ID ची गरज पडणार आहे. तरी आपला User ID घेण्यासाठी येथे नोंदणी करा. User ID असल्याशिवाय हा प्रश्नसंच सोडवता येणार नाही याची नोंद घ्यावी. (काल नोंदणी केलेल्या व आज नोंदणी होणार्या सर्वाना User ID पोहोच होतील)ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा' या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा.

कर्तव्यदक्ष
कर्तव्यशून्य
स्वच्छंदी
कृतघ्न

2. घोड्याचे खिंकाळणे, तर सापाचे .......

चित्कारणे
घुत्कारणे
फुसफुसणे
चेकाळणे

3. 'नटसम्राट' या नाटकाचे नाटककार कोण आहेत ?

विश्राम बेडेकर
प्र.के. अत्रे
राम गणेश गडकरी
वि.वा. शिरवाडकर

4. खालीलपैकी कोणत्या शब्दाला परि हा उपसर्ग लावल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल ?

रथी
मर्जी
घडी
पूर्ण

5. खालील पर्यायातून स्त्रिलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

सदरा
टोपी
पायजमा
हातरुमाल

6. एका गावात ९९५ स्त्री व १०३२ पुरुष मतदार आहेत. सन २०१३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत २३९ मतदारांनी मतदान केले नाही तर या निवडणुकीत एकूण किती मतदारांनी मतदान केले ?

२०२७
९८१
२३६६
१७८८

7. एका चौरसाचे क्षेत्रफळ ६४ सेंमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती ?

१६ सेंमी
१० सेंमी
१२ सेंमी
८ सेंमी

8. समभुज त्रिकोणासंबंधी योग्य विधान कोणते ?

या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात
या त्रिकोणाच्या दोन बाजू समान नसतात
या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात
या त्रिकोणाचे सर्व कोन काटकोन असतात

9. खालीलपैकी कोणत्या दिवशी एकच वार असेल ?

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन
महाराष्ट्रदिन, शिक्षकदिन
स्वातंत्र्यदिन, बालदिन
महात्मा गांधी जयंती, बालदिन

10. वर्तुळाचा व्यास १२ सेंमी असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

१२ सेंमी
६ सेंमी
८ सेंमी
२४ सेंमी

11. खालीलपैकी चोर व गुन्हेगारांना कोण पकडतात ?

न्यायाधीश
डॉक्टर
पोष्टमन
पोलिस

12. खालीलपैकी कोण स्वत:साठी निवारा तयार करतो ?

हत्ती
घोडा
सिंह
सुगरण

13. 'बालदिन' कोणत्या दिवशी साजरा करतात ?

महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी
साने गुरुजींच्या जयंतीच्या दिवशी
लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या दिवशी
पंडित नेहरुंच्या जयंतीच्या दिवशी

14. बाभळीचा काटा टोचला की वेदना होतात, कारण -

काट्याला टोक असते
काटा टोचल्यामुळे रक्त येते
काटा त्वचेत जातो
त्वचेला स्पर्शज्ञान असते

15. 'जमीन थरथरुन दुभंगणे' ही घटना कोणत्या नैसर्गिक संकटामुळे घडते ?

महापूर
वादळ
अतिवृष्टी
भूकंप

16. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव कोणी परतवले ?

बाबाजीराजे भासले
लखुजीराव जाधव
शहाजीराजे भासले
मालोजीराजे भासले

17. शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ कोणत्या किल्ल्यावर आहे ?

रायगड
प्रतापगड
राजगड
सिंहगड

18. राज्याभिषेकाच्या वेळी वापरण्यात आलेल्या घागरीत कोणत्या नदीचे पाणी नव्हते ?

यमुना
गोदावरी
तापी
नर्मदा

19. 'गोवळकोंडा' ही कोणाची राजधानी होती ?

आदिलशाहाची
कुतुबशाहाची
निजामशाहाची
औरंगजेबाची

20. मराठे घोडेस्वारांजवळ लढाईच्या प्रसंगी कोणते सामान असे ?

पाठीला ढाल
कमरेला तलवार
हातात भाला
सर्व पर्याय बरोबर
शुक्रवार दि. ०६ मार्च २०१५ रोजी बहुतेक शाळांना सुट्टी असल्याने ५० प्रश्नांचा सराव प्रश्नसंच देण्यात येईल. मात्र हा सराव प्रश्नसंच ज्या विद्यार्थ्यांना/शिक्षकांना/पालकांना ऑनलाईन सोडवायचा आहे त्यांना त्यासाठी User ID ची गरज पडणार आहे. तरी आपला User ID घेण्यासाठी येथे नोंदणी करा. User ID असल्याशिवाय हा प्रश्नसंच सोडवता येणार नाही याची नोंद घ्यावी. (काल नोंदणी केलेल्या व आज नोंदणी होणार्या सर्वाना User ID पोहोच होतील)